रस्ते आणि वाहतूक व्यवस्था
चांगले रस्ते आणि सक्षम वाहतूक व्यवस्था ही विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील रस्ते चांगले करणे, गावांना एकमेकांशी तसेच गावांना शहरांशी जोडणे, यावर भर दिला जाईल. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात सहज जाता यावे आणि शहरातील नागरिकांना ग्रामीण भागात सहज पोहोचता यावे, यासाठी चांगली आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगल्या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळही कमी होईल.


