
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुभाष (बापू) देशमुख यांनी लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजकारण आणि समाजसेवेची शिकवण लहानपणापासूनच मिळालेल्या बापूंनी जिद्द, मेहनत आणि कष्टाच्या जोरावर जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. सर्वसामान्य कुटुंबात आणि संस्कारक्षम वातावरणात वाढलेल्या बापूंनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून राजकारणात प्रवेश केला. आज ते दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत आहेत.
१२ मार्च १९५७ रोजी एका शिस्तप्रिय, शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आणि धार्मिक कुटुंबात बापूंचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ते शेतीची कामे सांभाळून शाळेत शिकवण्याचे काम करायचे. निवृत्तीनंतरही त्यांनी येडशी येथे विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल सुरू केले. त्यांच्या कुटुंबात वारीची परंपरा असल्यामुळे घरात भक्तीचे वातावरण असायचे. कष्ट, शिस्त, देशप्रेम आणि समाजसेवेचे संस्कार बापूंना घरातूनच मिळाले.
सोलापूर आणि वडाळा ही बापूंची कर्मभूमी आहे. सोलापूरमधील कापड गिरण्यांचा चांगला काळ आणि त्यानंतर झालेली त्यांची पडझड बापूंनी जवळून पाहिली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला या परिस्थितीतून बाहेर काढून त्याचा पुन्हा सर्वांगीण विकास करण्याचा निश्चय त्यांनी केला.

लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हे बापूंचे मोठे गुण आहेत. कोणतेही काम सर्वांनी एकत्र येऊन केले, तर ते यशस्वी होते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच सोलापूरच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्वांना त्यांनी नेहमीच सोबत घेतले आहे.
"माणसाच्या आयुष्यात संवादाला खूप महत्त्व आहे. आपले विचार आणि भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद हेच सर्वोत्तम माध्यम आहे. संवादामुळे अनेक प्रश्न आणि अडचणी सुटतात."
— सुभाष (बापू) देशमुख. लोकमंगल मासिकातील 'संवाद' या भागातून त्यांनी लोकांशी नियमितपणे आपले विचार शेअर केले.
तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, आपल्या शक्तीचा वापर समाजकारणासाठी करावा, पैशांचा योग्य वापर करावा, अडचणींना घाबरून न जाता मार्ग काढावा, सर्वांच्या मनात देशप्रेम असावे आणि भ्रष्टाचाराला विरोध करावा, हे बापूंचे विचार तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देतात.
सामाजिक कामांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट संस्था, साखर कारखाने यांसारख्या विविध संस्था सुरू केल्या. यासोबतच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी बचत गट, शेतकऱ्यांसाठी सहज कर्ज आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. या सर्व संस्थांमधून मिळणारा सर्व नफा फक्त सामाजिक कामांसाठीच वापरला जातो.
संघ परिवाराचा प्राथमिक सदस्य असणारा भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे. देशाच्या वेगवान प्रगतीचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवत हा पक्ष उदयास आला आहे. राष्ट्रीय एकता, अखंडता, शक्ती यांप्रती पक्षाची व्यक्तिगत व राष्ट्रीय भूमिका नेहेमीच अविचल राहिली आहे.
सामाजिक, सहकार आणि जनसेवेतील अतुलनीय योगदानासाठी प्राप्त गौरव
माऊली ज्ञानप्रबोधिनी ट्रस्ट, मलकापूर - कराड
श्री सिद्धेश्वर सेवा संघ, सोलापूर
जयहिंद परिवार, पुणे

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे हे बापूंचे ठाम ध्येय. अन्नपूर्णा योजना (दररोज ५००+ ज्येष्ठ नागरिकांना मोफत घरपोच भोजन, १४ लाखांहून अधिक जेवणाचे डबे वितरित), सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा (२१ वर्षांत ३,२२१ जोडप्यांचे विवाह), पाणी जिरवा व जलसंधारण (१० लाख घनमीटर गाळ उपसा, १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण), वृक्ष लागवड (एकाच वेळी २ तासांत २४,००० झाडे लावण्याचा विक्रम), आणि मोफत महाआरोग्य शिबिरे याद्वारे जनसेवेचे अविरत कार्य सुरू आहे.
मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा जन्म १२ मार्च १९५७ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते असून लोकमंगल परिवार या संस्थांच्या शृंखलेचे संस्थापक आहेत. नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी ७७,००० मते मिळवून दणदणीत विजय मिळवला.