सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोनला मंजुरी
ऊस उत्पादकांच्या एफआरपीसाठी आर्थिक आधार, साखर कारखान्यांच्या कामकाजात पारदर्शकता!
सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत देता यावी, यासाठी तत्कालीन सहकारमंत्री मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या कार्यकाळात सॉफ्ट लोन आणि व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली.
तसेच साखर कारखान्यांची गाळप परवाना प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. २०१७ मध्ये बापूंच्या हस्ते पहिल्या ५१ ऑनलाइन गाळप परवान्यांचे वितरण करण्यात आले. या बदलामुळे परवान्यांच्या प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्यास मदत झाली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
