नवीन वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३
वस्त्रोद्योगाला चालना, गुंतवणुकीत वाढ आणि रोजगाराच्या नव्या संधी!
मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांनी वस्त्रोद्योगमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ तयार करण्यात पुढाकार घेतला.
या धोरणांतर्गत राज्यात ₹३६,००० कोटींची गुंतवणूक आणणे आणि १० लाख नवीन रोजगार निर्माण करणे, ही उद्दिष्टे ठेवण्यात आली. कापसाचे उत्पादन घेण्यापासून त्यापासून कापड तयार करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्रातच व्हावी, यावर भर देण्यात आला. कापसासोबतच रेशीम, लोकर आणि इतर प्रकारच्या धाग्यांच्या उत्पादनालाही प्रोत्साहन देण्यात आले.
नवीन वस्त्रोद्योग सुरू करणाऱ्या तसेच सध्याच्या उद्योगांचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच सहकारी व खासगी सूतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर वस्त्रोद्योगांना वीज बिलात सवलत देण्यात आली. या धोरणामुळे राज्यात नवीन उद्योग सुरू होण्यास, गुंतवणूक वाढण्यास आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यास चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
