महारेशीम अभियान
रेशीम शेतीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन!
मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांनी वस्त्रोद्योगमंत्री म्हणून काम करताना राज्यात रेशीम शेतीचा विस्तार व्हावा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना या शेतीची माहिती मिळावी, यासाठी ‘महारेशीम अभियान’ राबवले.
या अभियानामुळे राज्यातील १३ हजार एकरांहून अधिक जमीन रेशीम शेतीखाली आली. पूर्वी रेशीम कोष विकण्यासाठी शेतकऱ्यांना बंगळुरू येथे जावे लागत होते. मात्र, जालना येथे रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता जवळच कोष विकण्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ आणि वाहतुकीचा खर्च कमी झाला.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
