लोकमंगल अन्नपूर्णा योजना (ज्येष्ठ नागरिकांना मोफत दोन वेळचे जेवण)
ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा आदरणीय भाग आहेत. मात्र कुटुंबाकडून आधार नसलेल्या किंवा असहाय्य वृद्ध नागरिकांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी बापूंनी "लोकमंगल अन्नपूर्णा योजना" सुरू केली. या योजनेतून सोलापूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) परिसरातील सुमारे ५०० हून अधिक वृद्ध, निराधार व गरजू ज्येष्ठ नागरिकांना दररोज दोन वेळचे ताजे, पौष्टिक व शुद्ध शाकाहारी जेवण त्यांच्या घरात मोफत पोहोचवले जाते. गेल्या ५ हून अधिक वर्षांपासून ही निस्वार्थ सेवा अविरतपणे सुरू आहे.
ठळक वैशिष्ट्ये व पात्रता निकष
- ६० वर्षांवरील निराधार, आजारी अथवा मदतीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक
- कुटुंबाचा आधार नसलेले किंवा आर्थिक दुर्बल वृद्ध व्यक्ती
- सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व धाराशिव परिसरातील रहिवासी
- घरोघरी सन्मानाने मोफत डबा घरपोच देण्याची व्यवस्था
आवश्यक कागदपत्रे
वय दाखला किंवा आधार कार्ड, लोकमंगल फाउंडेशन साध्या अर्जावर नोंदणी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
