खातेदारांना प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे सभासदत्व
सहकाराचा विस्तार, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ!
सहकार क्षेत्र अधिक व्यापक आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने तत्कालीन सहकारमंत्री मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या कार्यकाळात पात्र खातेदारांना प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे सभासदत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत राज्यातील ५ लाख १८ हजार खातेदारांना सभासदत्व देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा सहकारी संस्थांमधील सहभाग वाढवून त्यांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
