सुभाष (बापू) देशमुख
मुख्यपृष्ठपरिचय
गॅलरीबातम्या व कार्यक्रमब्लॉग

सुभाष (बापू) देशमुख

जनसंपर्क कार्यालय, सोलापूर

  • जनसंपर्क कार्यालय, मारुती सुझुकी अरेना (चव्हाण मोटर्स), होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र
  • ०२१७-२६०६०७०
  • ७७५५९०८५०१
  • office@subhashbapudeshmukh.in

लोकमंगल

  • लोकमंगल परिवार
  • लोकमंगल फाऊंडेशन
  • विश्वमंगल

विकासकामे

  • विकासकामे
  • व्हिजन सोलापूर
  • योजना

सेवा

  • कामाचे निवेदन
  • भेटीचे विवरण
  • शुभकार्याचे निमंत्रण
  • संपर्क करा
  • मुख्यपृष्ठ
  • परिचय
  • गॅलरी
  • बातम्या व कार्यक्रम
  • ब्लॉग

© २०२६ Subhash Bapu Deshmukh Office. सर्व हक्क राखीव.

सर्व योजनांकडे परत जा
शेतकरी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७

कर्जाच्या ओझ्यातून दिलासा, शेतकऱ्यांना आर्थिक आधार!

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ जाहीर करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी तत्कालीन सहकारमंत्री मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांनी सांभाळली.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी एकरकमी समझोता योजना राबवण्यात आली. तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा कमाल ₹२५,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

₹१.५० लाखांपर्यंत कर्जमाफी – पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला दिलासा.

एकरकमी समझोता योजना – दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद.

प्रोत्साहनपर अनुदान – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा कमाल ₹२५,००० लाभ.

थेट बँक खात्यात लाभ – पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज किंवा बचत खात्यात योजनेची रक्कम जमा करण्याची व्यवस्था.

योजनेचा एकूण लाभ

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार, या योजनेत कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहनपर अनुदान या तिन्ही घटकांतून एकूण ४४.०४ लाख लाभार्थ्यांना ₹१८,७६२ कोटींचा लाभ देण्यात आला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.

संपर्क साधा