सुभाष (बापू) देशमुख
मुख्यपृष्ठपरिचय
गॅलरीबातम्या व कार्यक्रमब्लॉग

सुभाष (बापू) देशमुख

जनसंपर्क कार्यालय, सोलापूर

  • जनसंपर्क कार्यालय, मारुती सुझुकी अरेना (चव्हाण मोटर्स), होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र
  • ०२१७-२६०६०७०
  • ७७५५९०८५०१
  • office@subhashbapudeshmukh.in

लोकमंगल

  • लोकमंगल परिवार
  • लोकमंगल फाऊंडेशन
  • विश्वमंगल

विकासकामे

  • विकासकामे
  • व्हिजन सोलापूर
  • योजना

सेवा

  • कामाचे निवेदन
  • भेटीचे विवरण
  • शुभकार्याचे निमंत्रण
  • संपर्क करा
  • मुख्यपृष्ठ
  • परिचय
  • गॅलरी
  • बातम्या व कार्यक्रम
  • ब्लॉग

© २०२६ Subhash Bapu Deshmukh Office. सर्व हक्क राखीव.

मुख्यपृष्ठबातम्या व कार्यक्रमबातमी
सर्व बातम्या व कार्यक्रम

बातमी

समृद्ध गाव अभियानाच्या प्रयत्नांना यश; सोलापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा गौरव

६ नोव्हेंबर, २०२६·सोलापूर
समृद्ध गाव अभियानाच्या प्रयत्नांना यश; सोलापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा गौरव

चिंचणीला प्रथम, उंदरगावला द्वितीय, तर चिनकेला तृतीय क्रमांक; सोलापूर सोशल फाउंडेशनच्या ग्रामविकास उपक्रमाला मिळाले यश

गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाली, तर गावाचा कायापालट घडू शकतो, याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये चिंचणी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, उंदरगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने द्वितीय, तर चिनके (ता. सांगोला) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामविकासाच्या प्रयत्नांना विशेष बळ मिळाले आहे.

आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून २०१८ पासून समृद्ध गाव अभियान राबविण्यात येत आहे. गावांचा सर्वांगीण विकास केवळ शासकीय योजनांमधून नव्हे, तर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून साधता येतो, हा या अभियानाचा मुख्य विचार आहे. याच भूमिकेतून गावांमध्ये सामाजिक उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासासाठी आवश्यक उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना एकत्र आणून गावाच्या गरजांनुसार विकासाचे नियोजन करण्यावर भर देण्यात येतो. स्थानिक पातळीवर विकासकामांचे नियोजन, लोकसहभागातून उपक्रमांची अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळे गावांच्या विकासाला दिशा मिळत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील तीन ग्रामपंचायतींचे यश हे याच सामूहिक प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल चिंचणी, उंदरगाव आणि चिनके या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि या कार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

दरम्यान, या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवून सोलापूर जिल्ह्यातील १०० गावांचा आदर्श गाव म्हणून विकास करण्याचा संकल्प सोलापूर सोशल फाउंडेशनने केला आहे. तीन ग्रामपंचायतींना मिळालेले हे यश त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. लोकसहभागातून अधिकाधिक गावांचा नियोजनबद्ध विकास साधत समृद्ध गाव, समृद्ध जिल्हा आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा अभियानाचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहे.

शेअर करा:WhatsAppFacebook
सर्व बातम्या व कार्यक्रम