सुभाष (बापू) देशमुख
मुख्यपृष्ठपरिचय
गॅलरीबातम्या व कार्यक्रमब्लॉग

सुभाष (बापू) देशमुख

जनसंपर्क कार्यालय, सोलापूर

  • जनसंपर्क कार्यालय, मारुती सुझुकी अरेना (चव्हाण मोटर्स), होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र
  • ०२१७-२६०६०७०
  • ७७५५९०८५०१
  • office@subhashbapudeshmukh.in

लोकमंगल

  • लोकमंगल परिवार
  • लोकमंगल फाऊंडेशन
  • विश्वमंगल

विकासकामे

  • विकासकामे
  • व्हिजन सोलापूर
  • योजना

सेवा

  • कामाचे निवेदन
  • भेटीचे विवरण
  • शुभकार्याचे निमंत्रण
  • संपर्क करा
  • मुख्यपृष्ठ
  • परिचय
  • गॅलरी
  • बातम्या व कार्यक्रम
  • ब्लॉग

© २०२६ Subhash Bapu Deshmukh Office. सर्व हक्क राखीव.

मुख्यपृष्ठबातम्या व कार्यक्रमबातमी
सर्व बातम्या व कार्यक्रम

बातमी

किल्ला बांधणी स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास आणि संस्कारांची ओळख

७ नोव्हेंबर, २०२६·सोलापूर
किल्ला बांधणी स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास आणि संस्कारांची ओळख

किल्ला बांधणी स्पर्धा हा केवळ मनोरंजनाचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास समजून घेण्याची संधी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना महाराजांचे कार्य, त्यांचे विचार आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास जाणून घेता येतो, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.

लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित किल्ला बांधणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक महेश भंडारी, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, उपाध्यक्ष मनीष देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महाराजांनी बांधलेले विविध गड-किल्ले आणि त्यांच्या उभारणीमागील उद्देश याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतानाच विद्यार्थ्यांनी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य आणि स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा जाणून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. भविष्यात डॉक्टर, अभियंता किंवा अन्य क्षेत्रांत यश मिळवणे महत्त्वाचे आहेच; मात्र आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या हितासाठीही केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजाप्रती आपली बांधिलकी जपावी, असे ते म्हणाले.

या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी महेश धाराशिवकर, डॉ. चंद्रकांत चव्हाण आणि इतिहासतज्ज्ञ प्रा. विजय कोळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या संचालिका सुजाता सुतार यांनी केले, तर विशाल गायकवाड यांनी आभार मानले. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा:WhatsAppFacebook
सर्व बातम्या व कार्यक्रम