शैक्षणिक योगदानशिक्षकरत्न पुरस्कार
सोलापूर
शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. मागील चार वर्षांत ४४ शिक्षकांचा सन्मान या पुरस्कारांद्वारे करण्यात आला आहे.
