शैक्षणिक योगदानगणवेश, शालेय साहित्य व शिष्यवृत्ती
सोलापूर जिल्हा
शिक्षणाविषयी आत्यंतिक तळमळ असणाऱ्या बापूंनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच पुढील शिक्षणासाठी पाठबळ मिळावे यासाठी प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. यापैकी एक उपक्रम म्हणजे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, गणवेश यांचे मोफत वाटप केले जाते. याचबरोबर हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते.
