शैक्षणिक योगदानवक्तृत्व स्पर्धा
सोलापूर
विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचा विकास व्हावा आणि त्यांच्या अंगी सर्वगुणसंपन्नता यावी तसेच सभाधीटपणा वाढीस लागावा या हेतूने लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच शिशुवर्गासाठी बडबडगीत स्पर्धेचे आयोजनही केले जाते. या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातात.
