खातेदारांना प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्थेचे सभासदत्व
महाराष्ट्रात सहकार क्षेत्र मोठे आहे. सहकार खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांनी सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, पात्र असलेल्या सर्व खातेदारांना प्राथमिक कृषी पतसंस्थेचे सभासद करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत राज्यातील ५ लाख १८ हजार खातेदारांना या संस्थांचे सभासदत्व देण्यात आले असून, या सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती करता येईल, असा बापूंचा विश्वास आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
