छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७
शेतकऱ्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७' सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ₹१.५० लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ४३.१८ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. यासाठी आतापर्यंत ₹१८,००८.१ कोटी रक्कम देण्यात आली आहे. पंजाबमध्ये ₹१०,००० कोटी, आंध्र प्रदेशात ₹१५,००० कोटी, कर्नाटकात ₹८,००० कोटी आणि तेलंगणात ₹१०,००० कोटींची कर्जमाफी करण्यात आली. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राने ₹३४,००० कोटींची कर्जमाफी केली. दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक होती.
ठळक वैशिष्ट्ये व पात्रता निकष
- देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व, ऐतिहासिक व पारदर्शक सर्वात मोठी कर्जमाफी
- प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी
- शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम थेट जमा
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५% प्रोत्साहनपर अनुदान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
