महारेशीम अभियान
राज्यात रेशीम शेती वाढावी आणि शेतकऱ्यांना रेशीम शेतीची माहिती मिळावी, यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून 'महारेशीम अभियान' राबवण्यात आले. या अभियानामुळे आतापर्यंत १३,००० हून अधिक एकर जमीन रेशीम शेतीसाठी वापरली जात आहे. पूर्वी रेशीम कोष विकण्यासाठी शेतकऱ्यांना बंगळुरूला जावे लागत होते. आता जालना येथे कोष खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रवासाचा वेळ आणि वाहतुकीचा खर्च कमी झाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
