टेक्सटाईल पार्क
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. या कापसावर राज्यातच प्रक्रिया व्हावी, यासाठी अमरावती येथे टेक्सटाईल पार्क सुरू करण्यात आले आहे. या पार्कला उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कापूस पिकवणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल पार्क सुरू करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. यामुळे कापसापासून तयार होणाऱ्या वस्तूंमधून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
