निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालातून जास्त फायदा मिळावा, यासाठी पणन विभागाकडून शेतमाल निर्यातीसाठी योजना आणि नियम तयार केले जातात. राज्यात भाजीपाला आणि इतर शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी ४५ निर्यात केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये फळे आणि भाजीपाल्यासाठी ४२ केंद्रे, तर फुलांसाठी ३ केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये शेतमाल परदेशात पाठवण्यापूर्वी त्यावर आवश्यक प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. यामध्ये विकिरण प्रक्रिया, व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि हॉट वॉटर ट्रीटमेंट यांचा समावेश आहे. युरोपमध्ये भाजीपाला पाठवण्यासाठी आवश्यक असलेले प्रक्रिया केंद्र वाशी येथे सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हे एकमेव असे केंद्र आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
