शेतकऱ्यांची अडत मुक्ती
शेतकऱ्यांची अडते आणि व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी शेतीमालावरील अडत काढून टाकण्याचा आणि भाजीपाला बाजार समितीच्या नियमातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी बाजार समितीशिवाय इतर ठिकाणीही विक्री करता येऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
