शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान करता येत नव्हते. मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडे किमान १० आर जमीन आहे आणि ज्यांनी मागील पाच वर्षांत किमान तीन वेळा आपला शेतमाल विकला आहे, अशा शेतकऱ्यांना बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करता येऊ लागले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
