देशातील एकूण खरेदीच्या ५०% पेक्षा जास्त तूर खरेदी
सन २०१६-१७ मध्ये राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. तूर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी पणन विभागाने तुरीला प्रति क्विंटल ₹५,०५० हमीभाव दिला. महाराष्ट्रात देशातील एकूण तूर खरेदीपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ६५ लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी करण्यात आली. ही खरेदी कमी वेळेत करण्यात आली. तूर खरेदीची प्रक्रिया स्पष्ट आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने व्हावी, यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
