पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना
राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये पैसे ठेवणाऱ्या लोकांच्या ठेवींना सुरक्षितता मिळावी आणि पतसंस्थांवर लोकांचा विश्वास वाढावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नागरी, ग्रामीण बिगरशेती, महिला, पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ₹१ लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. राज्यातील ८,४२१ पतसंस्थांमधील सुमारे ₹४०,००० कोटींच्या ठेवींना या योजनेचा फायदा होणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये व पात्रता निकष
- पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची सभासद असणे अनिवार्य
- मागील ३ आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालाचा वर्ग "अ" किंवा "ब" असावा
- ३१ मार्च २०१८ अखेरच्या ठेवींच्या ०.१% रकमेचे महामंडळाचे भाग खरेदी करणे आवश्यक
- मागील ३ वर्षांच्या नेट एन.पी.ए. चे सरासरी प्रमाण ५% पेक्षा कमी असावे
- मागील ३ वर्षांच्या सी.डी. रेशोची सरासरी ५५ ते ७५% दरम्यान असावी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
