सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोनला मंजूरी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जावे तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या प्रशासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी सहकार खात्याकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एफआरपीची रक्कम देता यावी यासाठी ₹2,209 कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर करण्यात आले, त्यासाठी ₹468 कोटींचे व्याज अनुदान राज्य शासनातर्फे दिले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या गाळप परवान्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
