शालेय विद्यार्थ्यांमध्ये विद्याभ्यासासह विविध कलागुणांचाही विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धांच्या रूपाने एक व्यासपीठ प्रतिष्ठानच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाते. यांपैकी एक उपक्रम म्हणजे सोलापूरमधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणार्या भव्य चित्रकला स्पर्धा. दर वर्षी या स्पर्धेमध्ये विद्यार्थांचा सहभाग वाढतच जात आहे. मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व परितोषिक वितरण केले जाते.





