दहावी व बारावी नंतर करिअर घडविण्याच्या दृष्टीने कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे नेहेमीच उभा असतो. या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आय.टी. क्षेत्रामध्ये जाऊ पाहणार्या युवक युवतींना या क्षेत्रातील संधींविषयी माहिती मिळावी यासाठी आय.टी. करिअर अँड फेस्टिव्हलचेही आयोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. आय.टी. क्षेत्रातील विविध संधींवर प्रकाश टाकणार्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. या फेस्टिव्हलमध्ये आय.टी. क्षेत्रातील अनेक मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली. या फेस्टिव्हलमध्ये आय.टी. क्षेत्रातील ३६ कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला.







